Conspiracy of youths of Uttar Pradesh to break ATM in Chandrapur
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज जवळील एटीएम फोडण्याचा कट रचनारे तिघांपैकी उत्तर प्रदेशातील दोन युवकांना चंद्रपूर शहर पोलीसांनी अटक केली आहे. Conspiracy of youths of Uttar Pradesh to break ATM in Chandrapur
राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज समोरील बगीच्यात बसून काही युवक एटीएम फोडण्याचा बेत रचत असल्याची माहिती पेट्रोलिंग करीत असतांना शहर पोलीसांना प्राप्त झाली, पोलीस निरीक्षक पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होताच युवकांनी पळायला सुरुवात केली, पोलिसांनी पाठलाग करीत दोघांना ताब्यात घेतले तर एक फरार होण्यात यशस्वी झाला. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली यावरून आरोपी सत्यबीर अनयसिंग सिंग (21 वर्ष) रा.इब्राहिमपूर, जि. फतेहपूर तर दिपांशू राजकरन पटेल (19 वर्ष) रा. बलियार पूर, जि. बांधा, राज्य उत्तरप्रदेश यांना अटक करीत त्यांचे कडून गुन्ह्यात वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. Chandrapur Crime
आरोपीना विचारपूस केली असता त्यांनी आदिलाबाद, करीमनगर, मध्यप्रदेश तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे एटीएम मध्ये चोरी केल्याची कबुली दिली. Chandrapur City Police Station
सदर कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर, संदीप बच्छीरे पोउपनि, पोहवा सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, राहुल चितोडे, विक्रम मेश्राम तसेच गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.



