चंद्रपूर :- सन 2026 च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. Government Awards for Outstanding Public Ganeshotsav Mandals
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 17 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार दि. 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. धारिवाल इन्फ्राचा अरण्यगर्भ, 18 हजार वृक्षांची लागवड……
शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या अथवा पूर्तता करू शकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा. इच्छुक मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे mahotsav.pida@gmail.com या ई-मेलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा.
स्पर्धेचे निकष, नियम व इतर सविस्तर माहितीसाठी संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्याचे सादरीकरण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.