Saturday, January 24, 2026
HomeCrimeबाबुपेठ परिसरात घरफोडी : अवघ्या काही तासातच आरोपीला अटक

बाबुपेठ परिसरात घरफोडी : अवघ्या काही तासातच आरोपीला अटक

बाबुपेठ परिसरात घरफोडी

अवघ्या काही तासातच आरोपी अटकेत

चंद्रपूर :- शहरातील बाबुपेठ परिसरातील महादेव मंदिर जवळ वास्तव्यास असलेले कुटुंब बाहेरगावी गेले असता घराची घरफोडी झाली, चंद्रपूर शहर पोलीसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक करीत चोरीतील सोने चांदीचे दागिने असा 58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Burglary Crime in Babupeth

बाबुपेठ परिसरातील महादेव मंदिराजवळ राहणारे प्रमोद मंगरूळकर हे कुटुंबासह दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी बाहेरगावी गेले असता दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेजाऱ्यांना त्यांचे घराचे दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसल्याचा फोन आला यावरून मांगरुडकर चंद्रपूर परत येऊन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. Chandrapur City Police Station

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता DB गुन्हे शोध पथक घटनास्थळी रवाना होत तपास सुरु केला, गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपीने मित्रासह गुन्हा केल्याचे कबूल केले दरम्यान आरोपी व्यंकटेश उर्फ व्यंक्या कोपेलवार (21 वर्ष) याला अटक करून चोरीतील सोने चांदीचे दागिने असा एकूण 58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचा मित्र याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरु आहे. City police arrested the accused in just a few hours

सदर कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे नेतृत्वात संदीप बच्छीरे पोउपनि, पोहवा सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, भावाना रामटेके, कपुरचंद खरवार, इम्रान खान, रूपेश रणदिवे दिलीप कुसराम, राहुल चितोडे, विकम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular