Sunday, August 30, 2026
HomeCrimeमूल पोलिसांची नाकाबंदी

मूल पोलिसांची नाकाबंदी

चंद्रपूर :- गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मूल पोलिसांनी धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी २४ गोवंशीय जनावरांची सुटका केली. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८ बोलेरो पिकअप वाहने जप्त केली असून, या कारवाईत तब्बल ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Cattle Smuggling मनपा अभ्यासकांची अवस्था सुधारा… अन्यथा आंदोलन….

दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मूल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोस्टे हद्दीतील मौजा बेंबाळ चौकीसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी आठ बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण २४ गोवंशीय जनावरे आढळून आली. या जनावरांना चारा-पाण्याची सोय न करता, वेदना पोहोचवून कत्तल व विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. Mul Police Station

कारवाईदरम्यान ५ लाख ५५ हजार रुपये किमतीची २४ गोवंशीय जनावरे आणि ४० लाख रुपये किमतीची आठ पिकअप वाहने, असा एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी महेश देवीदास फटिंग (३७, रा. कुंझा), किशोर सेवक नागपुरे (३८, रा. बोडेगाव), विक्की धनपाल देशमुख (२८, रा. वेडवा), अंकुश देवराव मेंढले (४८, रा. पवनी), दिपक यादव चुनरी (४२, रा. व्याहाड खुर्द), दिपक योगराज कांबळे (२५, रा. किटाळी), दिगंबर मंगरू मुनघाटे (३६, रा. आंबेशिवणी) आणि राहुल मोरेश्वर चौधरी (३६, रा. चकचिरंजी) यांच्याविरुद्ध मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५(क) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(डी)(एच) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेवा इंदल राठोड करीत आहेत.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि सुरेश कन्नाके, पोउपनि रूपेश कुंभार, पोउपनि उमेश पिपरे, पोउपनि व्यंकटेश दोनाडे, पोहेवा इंदल राठोड, सुनील कुळमेथे, पोअं दिलीप आडे, नरेंद्र वाकडे, प्रकाश चिकराम, शंकर बोरसरे, प्रमोद सावळसाकडे आदी पोलीस स्टेशन मूल येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular