Saturday, January 18, 2025
HomeMaharashtraमहाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस तर्फे बुथ व बिएलए कार्यकर्ता मेळावा संपन्न.

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस तर्फे बुथ व बिएलए कार्यकर्ता मेळावा संपन्न.

Booth empowerment is important to win elections – MP Pratibha Dhanorkar

Booth and BLA workers meeting concluded by Maharashtra Pradesh Congress

चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभेचे Vidhansabha Election बिगुल लवकरच वाजणार असून प्रत्येक पक्षाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. कॉग्रेस पक्षातर्फे बुथ व बिएलए कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दि. 25 ऑगस्ट रोजी जिजाऊ लॉन येथे करण्यात आले होते. Booth and BLA workers meeting of Congress
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाने विजय प्राप्त केल्यानंतर पक्षाने आता विधानसभेकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने जिजाऊ लॉन येथे बुथ व बिएलए कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला संबोधित करतांना खासदार धानोरकर म्हणाल्या की, आपण लोकसभेत विजय जरी प्राप्त केला असेल तरी प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. याकरीता प्रत्येक कार्यकर्त्यांने आपले बुथ सशक्त करणे गरजेचे आहे. आपल्या बुथ अंतर्गत येणाऱ्या मतदारांपर्यंत आपल्या पक्षाची ध्येय धोरणे पोहचविणे गरजेचे आहे. सरकार चे अपयश आपल्या बुथ अंतर्गत येणाऱ्या नागरीकांना सांगावे लागेल. त्यासोबतच आपल्या बुथ अंतर्गत मतदारांच्या अडचणी समजुन काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक बिएलए BLA ने नागरीकांपर्यंत पोहोचून त्यांचे यादीत नाव किंवा चुका असतिल तर कागदपत्रे एकत्रित करुन BLO बिएलओं कडे देऊन मतदार यादीत प्रत्येक नागरीकांचे नाव समाविष्ठ करुन घ्यावे. आपला पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून प्रत्येकाला न्याय देणारा आहे. येणाऱ्या निवडणूका या आमदार पदी विराजमान होणाऱ्या उमेदवारांच्या नसुन या निवडणूका या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आहे असे समजून काम करावे, असे मत खासदार धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी व्यक्त केले.
यावेळी पुणे येथुन आलेल्या मान्यवरांनी बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी MLA Subhash Dhote आमदार सुभाष धोटे, MLA Abhijit Wanjari आमदार अभिजित वंजारी यासह कॉग्रस कमेटी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular