Saturday, January 18, 2025
HomeMaharashtraकढोली ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

कढोली ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

Congress’s victory over Kadholi Gram Panchayat:                                                  Umaji Atram Sarpanch of Congress overturned the 40-year rule of the farmers’ organization

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या, मागील ४० वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या कढोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पार पडलेल्या निवडणूकीत काँग्रेसने शे. संघटनेच्या गडाला सुरूंग लावित येथे कांग्रेसचा झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. Congress’s victory over Kadholi Gram Panchayat

कढोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निर्मलाताई मरस्कोल्हे व सदस्य सीताताई पंधरे यांचेवर अपात्रतेची कार्यवाही झाल्याने येथे सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली यात काँग्रेसचे उमाजी आत्राम यांनी निर्णायक विजय मिळवून शेतकरी संघटनेला धोबीपछाड दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी गाडगे यांनी काम पाहिले.

येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कांग्रेसचे प्रशांत मसे, भाष्कर मत्ते, रंजनाताई आत्राम, वृंदाबाई वडस्कर हे कार्यरत आहेत.

काँग्रेस पक्षाला कढोली येथे मिळालेल्या या विजयाचा जल्लोष व्यक्त करण्यासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी सहभागी होऊन तसेच विजयी सभा घेवून नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक गावकरी सर्वांचे अभिनंदन केले.

कढोली वासीय जनता तसेच परिसरातील जनतेने काँग्रेस पक्ष, नेतृत्व आणि विचारधारेवर विश्वास दाखविला असून येणाऱ्या काळात या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, कृ. उ. बा. स. संचालक गणेश गोडे, माजी उपसभापती संभाजी कोवे, अनिल गोंडे, कढोली सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय बोंडे, तमुस अध्यक्ष राजेंद्र पिंपळशेंडे, कोरपना यु. काँ. अध्यक्ष प्रेम बोंडे, नागेश बोंडे, नरेश कोवे, दत्ता उपरे, अमोल वरारकर, बंडू वडस्कर, अरविंद बोंडे, नितेश निब्रड यासह कढोली आणि परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular