Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionकिशोर जोरगेवार व डाॅ रमेशकुमार गजभे यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात भाजप संघटन प्रबळ

किशोर जोरगेवार व डाॅ रमेशकुमार गजभे यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात भाजप संघटन प्रबळ

BJP organization in the district has been strengthened with the entry of Kishore Jorgewar and Dr. Ramesh Kumar Gajbhe – Hansraj Ahir
चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान आमदार किशोर जोरगेवार व राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माना समाजाचे दिग्गज नेते डाॅ. रमेशकुमार गजभे यांची घरवापसी झाल्याने पक्षाची राजकीय ताकद शतपटीने वाढली असून या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाला पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी व्यक्त केला. BJP organization in the district has been strengthened
जिल्ह्यात भाजपाचे प्रबळ संघटन अस्तित्वात असून जोरगेवार MLA Kishor Jorgewar व गजभे Dr Ramesh Gajbhe या लोकप्रिय नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर, वरोरा, चिमुर सह संपुर्ण जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार लाभणार असून भाजपा या प्रवेशाने पुन्हा संघटनात्मकदृष्ट्या मजबुत होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
भाजपामध्ये प्रवेश करणारे किशोर जोरगेवार हे महायुतीचे चंदपूर विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाने अनुसुचित जाती वर्ग भाजपाप्रती अनुकुल राहील तसेच डाॅ. गजभे यांच्या राजकीय क्षेत्रातील गाढा अनुभव व अनुसुचित जमाती प्रवर्गात प्रभाव राखणाऱ्या या नेत्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल असे सांगत सर्व समाजामध्ये असलेला उभयतांचा प्रभाव दखलपात्र ठरेल असा आशावादही हंसराज अहीर यांनी व्यक्त केला असून या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे त्यांनी स्वागत केले आहे.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular