Thursday, April 24, 2025
HomeAssembly Electionराजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा अर्ज खारिज करा

राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार देवराव भोंगळे यांचा अर्ज खारिज करा

Rajura assembly BJP candidate Devrao Bhongle’s four applications have errors
Application should be rejected immediately as it is not eligible

चंद्रपूर :- 70 राजुरा विधानसभा मतदार संघाअंतर्गत भाजपच्या Bjp वतीने उमेदवारी दाखल केलेले उमेदवार देवराव भोंगळे Devrao Bhongle यांच्या चारही अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात देवराव भोंगळे यांनी अर्जांमध्ये काही महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवल्याने हे चारही अर्ज तातडीने फेटाळण्याची मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार भूषण फूसे Bhushan Fuse आणि सूरज ठाकरे Suraj Thakre यांनी पत्रकार परीषदेत केली आहे. Rajura assembly BJP candidate Devrao Bhongle’s four applications have errors देवराव भोंगळे यांचा नामांकन अर्ज खारीज करा

भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने दिलेल्या माहितीचा तपशील मांडला. चारही उमेदवारी अर्जात टाकलेली माहिती चुकीची आणि आक्षेपार्ह आहे. त्यामुळे सूरज ठाकरे आणि भूषण फुसे यांनी भोंगळे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात 120 अर्ज वैध तर 30 नामांकन अवैध

नियमानुसार 2022 पर्यंत सरकारी थकबाकी किती आहे याची माहिती भोंगळे यांना द्यायची होती. पण ती दिली नाही. 2001 – 05 मध्ये भोंगळे घुग्घुस ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यावेळी शासकीय लेखापरीक्षण केले असता भोंगळे यांच्याकडे सन 2001 – 2002 मध्ये 4 लाख 62 हजार 593 रुपये, 2002 – 2003 मध्ये 4 लाख 77 हजार 50 रुपये, 2003 – 2004 साली 4 लाख 78 हजार 832 रुपये, वर्ष 2004 – 2005 मध्ये 6 लाख 86 हजार 491 रूपए भोंगळे यांचेकडे शेष आहे. ही रक्कम भोंगळे यांचेकडून वसूल करण्याचे आदेश शासकिय ऑडिट मध्ये नोंदविले आहे. परंतु सादर केलेल्या चार उमेदवारी अर्जांमध्ये याबाबत कोणतेही स्पष्टीकरण किंवा खुलासा झालेला नाही.

त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी सूरज ठाकरे आणि उमेदवार भूषण फुसे यांनी केली आहे.

यासंदर्भ में मुंबई उच्च न्यायालयांच्या नागपुर खंडपीठ मधे केस दाखल करण्याची माहीती दिली.

आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. दिलीप चौधरी, भूषण फुसे, सुरज ठाकरे, रामदास चौधरी, गोमती पाचभाई उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular