चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील महिला, युवक, दिव्यांग, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नशामुक्ता समाजासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा…….
यावेळी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच शासन-प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
चंद्रपूर हा औद्योगिक व खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा असतानाही स्थानिक युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा मेळाव्यात उपस्थित करण्यात आला. रानहत्ती व हिंस्र वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा…….
जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार मिळावा, यासाठी ठोस धोरणात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका
WCLच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित होणारे शेतकरी, जमीनधारक, प्रकल्पग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, पुनर्वसन, रोजगाराच्या संधी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दिव्यांगांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणीची मागणी
दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, तसेच शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळताना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली.
महिला व युवकांच्या प्रश्नांवरही चर्चा
महिलांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचवाव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.
युवकांच्या वाढत्या बेरोजगारीवरही मेळाव्यात चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, कौशल्य प्रशिक्षण, उद्योग-व्यवसायासाठी मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
शेतकरी, कामगार, महिला, युवक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवणार
चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
मेळाव्याचे आयोजन शिवसैनिक ललित कासट व कामगार नेते रोशन हर्बडे यांनी केले. यावेळी हर्षल शिंदे, संजय देशमुख, प्रवीण हेंदवे, मुकेशभाऊ जिवतोडे, युवराज धानोरकर, बंडू हजारे, नितीन मते, प्रतिमा ठाकूर, शैलेश केलझलकर, शेरखान पठाण, संतोष पारखी, महेश डोंगर, भरत गुप्ता, अमोल मांढरे, अमित यादव, आमिष पिले, नथु नवले, निरुदिन पटेल, संतोष बिडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
