Chandrapur city police take drastic action
चंद्रपूर :- दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील डि.बी. पथकाने मोठी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार लोखंडी खंजर व इतर साहित्य असा एकूण १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Four arrested with country-made knives, Mauser and live cartridges
डि.बी. पथक पेट्रोलिंग दरम्यान असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेकार्डवरील आरोपी छोटू सूर्यवंशी (रा. बल्लारपूर) हा आपल्या काही साथीदारांसह काळ्या रंगाच्या डस्टर गाडीतून गंजवार्ड येथील दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेज समोर देशी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दोन पंचांसह पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला.
तिथे काही संशयित इसम गाडीच्या बाजूला उभे दिसले तर दोन जण गाडीत बसलेले होते. पोलिसांनी घेराव घालताच चार इसम पळून गेले; मात्र चार जणांना शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले. Chandrapur city police take drastic action
डस्टर गाडीची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटखालील पिशवीतून दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजर व अन्य साहित्य आढळले. या प्रकरणी अपराध क्र. ७५८/२०२५, कलम ३१०(४) भा.दं.वि. सह कलम ३, ४, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके (पो. स्टे. चंद्रपूर शहर) करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी प्रमोद चौघुले, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके (पो. स्टे. चंद्रपूर शहर) यांच्या नेतृत्वात सपोनी राजेंद्र सोनवणे, पो.उ.नि. दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पो.ह.वा. लक्ष्मण रामटेक, संजय धोटे, इम्रान शेख, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदुरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, म.पो.अ. दीपीका झिंगरे व सारीका गौरकार यांनी संयुक्तपणे केली.