Monday, September 28, 2026
HomeCrimeसाहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा

साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा

चंद्रपूर :- आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी दिवंगत साहील वाकोडे Sahil Wakode यांच्याशी संबंधित कथित जातीय भेदभावाच्या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टी, BSP Chandrapur जिल्हा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. बसपाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. Caste based discrimination

निवेदनात विद्यार्थ्याशी संबंधित प्रकरणाबाबत विविध आरोप व दावे समोर आले असून, त्यांची वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी होणे आवश्यक आहे, संबंधित घटनाक्रमाची सखोल चौकशी करून नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

आयआयटी मुंबई येथील साहिल वाकोडे यांच्या आत्महत्या प्रकरणात कथित जातीय भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून उपलब्ध पुरावे, संबंधित व्यक्तींची बाजू आणि संपूर्ण घटनाक्रम तपासण्यात यावा, चौकशी दरम्यान कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेबाबत पूर्वग्रह न ठेवता सर्व संबंधितांची बाजू ऐकून घेण्यात यावी. चौकशीत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

शैक्षणिक संस्थांमध्ये भेदभाव रोखण्यासाठी उपाययोजना

राज्यातील तसेच देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, समान आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे, यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची निष्पक्षपणे दखल घेण्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत ठेवावी, तसेच तक्रारींची वेळेत चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची व्यवस्था मजबूत करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले. शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक सलोखा, समानता आणि बंधुतेचे वातावरण कायम राहण्यासाठी प्रशासन तसेच संबंधित संस्थांनी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

चौकशीतून सत्य समोर येण्याची अपेक्षा

या प्रकरणाबाबत विविध स्तरांवर चर्चा होत असताना, आरोपांची सत्यता आणि संपूर्ण घटनाक्रम अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित विद्यार्थ्याला न्याय मिळण्याबरोबरच कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर अन्याय होऊ नये, यासाठी चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होणे गरजेचे असल्याचेही निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.

या वेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ लाडे, जिल्हा सचिव संजय मेश्राम, जिल्हा प्रभारी मिलिंद शेंडे, जिल्हा कार्यसल्लागार रवीभाऊ वानखेडे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सायाजी लोनारे, विधानसभा कोषाध्यक्ष मनोहर साखरे, चंद्रपूर शहर अध्यक्ष इंजि. विमित कोसे, शहर सदस्य अखिल निमगडे, शहर सचिव इंजि. शुभम सागोरे, बाबूपेठ सेक्टर प्रभारी किशोर चिकाटे, चंद्रपूर शहर संयोजक दादाजी धाकडे, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष मनोज जांभुळे, मूल शहर अध्यक्ष नरेश शेंडे, मूल शहर उपाध्यक्ष सत्यवान, कार्यकर्ते प्रशांत उंदीरवाडे, वतन दुधे, नवानंद खंडाडे, कामडे साहेब, नामदेव रामटेके, नरेंद्र रंगारी, जयकुमार देवतळे, प्रेमलाल मानकर, बागेश्वर रामटेके, हीरालाल खोब्रागडे, नितेश नरगडे आणि विजय उराडे यांसह असंख्य बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular