चंद्रपूर :- शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने राजुरा येथे भाजप सरकार च्या विरोधात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.Congress’s massive ‘Jan Aakrosh Morcha’ (Public Outrage Rally) against the BJP government
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन……
चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी ११ वाजता भवानी माता मंदिर येथून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांचे फलक, घोषणाबाजी आणि सरकारच्या धोरणांविरोधातील घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताचे राष्ट्रपती आणि जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या मार्फत देण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून भव्य जाहसभा घेण्यात आली.
यात राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतमालाला कायदेशीर हमीभाव मिळावा, खते-बियाण्यांचा काळाबाजार थांबवावा, जिवतीतील सातबारा व फार्मर आयडीचे प्रश्न सोडवावेत, तसेच राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावेत, अखंडित वीजपुरवठा करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करून वगळण्यात आलेल्या महिलांना न्याय द्यावा, नवीन नोंदणी सुरू करावी, महिलांवर NCMC कार्डची सक्ती करू नये, निराधारांना नियमित आर्थिक मदत द्यावी, स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवरील अतिरिक्त आर्थिक भार थांबवावा, मतचोरी ची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, ग्रामीण व शहरी भागातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, घरकुल व सामाजिक सुरक्षा योजनांचे प्रलंबित लाभ द्यावेत, पेपरफुटीला आळा घालावा, स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींपासून नागरिकांना दिलासा द्यावा, e20 पेट्रोल बंद करण्यात यावे या मागण्यांसह OBC समाजाची जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र नोंद करावी व OBC, SC आणि ST समाजाचा निधी अन्य कामांसाठी खर्च करू नये, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सभामंचावर राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयराव बावणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदाताई जेनेकर, विनोद दत्तात्रय, प्रमोद बोरीकर, दिपक वाढई, नगराध्यक्षा अल्काताई वाढई, नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजु रेड्डी, संजय मेंढी, देवेंद्र आर्या, सभापती अशोकराव बावणे, तिरुपती इंदूरवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, रंजन लांडे, डॉ. अंकुश गोतावळे, अशोक रेचनकर, गोविंदा उपरे, अब्दुल करीम, निर्मला कुडमेथे, सोनू दिवसे, आशाताई खासरे, विचार मंच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सपना मोरे, यांचेसह राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन सचिन फुलझेले यांनी केले.
काँग्रेस प्रवक्ते हणमंत पवार –
“आज महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, कर्जमाफी नाही, महागाई वाढत आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे आणि विविध शासकीय योजनांच्या लाभापासून नागरिक वंचित राहत आहेत. लोकशाही व्यवस्थेत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजुरातील हा जन आक्रोश मोर्चा जनतेच्या मागण्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणारा आहे. सरकारने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा.
जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे —
“शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई व सरसकट कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे. जिवतीतील सातबारा व फार्मर आयडी, शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी पट्टे, अखंडित वीजपुरवठा, लाडकी बहीण योजनेतील महिलांचे प्रश्न, रस्ते, घरकुल आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न तातडीने सोडवले पाहिजेत. पेपरफुटीला आळा बसला पाहिजे, मतचोरी ची चौकशी झाली पाहिजे, मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांना अटक झाली पाहिजे, शासनाने या हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचा लढा अधिक तीव्र केला जाईल. या हुकूमशाही सरकार विरोधात आमचे नेते राहुलजी गांधी संघर्ष करीत आहेत, आम्ही संपूर्ण जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकर्ते पुर्ण ताकदीने त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहून संघर्ष करणार आहोत, जनतेचे पुर्ण समर्थन काँग्रेसच्या बाजूने आहे, येणाऱ्या काळात ही जनता केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही”
खासदार प्रतिभाताई धानोरकर—
“राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या विविध प्रश्नांसाठी मोठ्या संख्येने एकत्र येत जन आक्रोश व्यक्त केला आहे. पीक नुकसानभरपाई, कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित प्रश्न, रोजगार, रस्ते, घरकुल आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न तातडीने मार्गी लागले पाहिजेत. स्मार्ट मीटर ची सक्ती, सोलर पंप ची सक्ती बंद झाली पाहिजे. जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस सातत्याने आवाज उठवत राहील आणि शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे.”
