चंद्रपूर :- विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा, तसेच निवडणूक आयोग मतचोरी करून भाजपा फायदा पोहचवित असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजुरा येथे आंदोलन केले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. Congress workers burn an effigy of CEC Gyanesh Kumar
SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली.
या पार्श्वभूमीवर द इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या तपासणी अहवालाचा काँग्रेसने आधार घेतला आहे. अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत आयोगाच्या विविध निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले. नव्या मतदारांच्या नोंदणीसाठीच्या Form-6 मधील बदल, SIR दरम्यान मतदारांची नावे वगळणे व पुनर्स्थापित करणे तसेच मतदार यादीच्या IT प्रणालीच्या केंद्रीकरणासंदर्भात या आक्षेपांचा वृत्ताचा संदर्भ दिला आहे. Congress alleges ‘vote theft’ under the guise of ‘SIR’

काँग्रेसने या मुद्यांवरून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, SIR च्या माध्यमातून मतदारांच्या हक्कांवर परिणाम होत असल्याचा आरोप केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. त्यामुळे मतदार यादी, SIR प्रक्रिया आणि आयोगातील निर्णयप्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयराव बावणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदाताई जेनेकर, विनोद दत्तात्रय, प्रमोद बोरीकर, दिपक वाढई, नगराध्यक्षा अल्काताई वाढई, नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजु रेड्डी, संजय मेंढी, देवेंद्र आर्या, सभापती अशोकराव बावणे, तिरुपती इंदूरवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, रंजन लांडे, डॉ. अंकुश गोतावळे, अशोक रेचनकर, गोविंदा उपरे, अब्दुल करीम, निर्मला कुडमेथे, सोनू दिवसे, आशाताई खासरे, विचार मंच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सपना मोरे, यांचेसह राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
