Saturday, July 18, 2026
HomeElectionघंटागाडी कामगार आणि कॅटरर्स घडवणार इतिहास ?

घंटागाडी कामगार आणि कॅटरर्स घडवणार इतिहास ?

Will the garbage truck workers and caterers make history ?

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांचा प्रचार जोर धरू लागला असून प्रचार रॅली, गृहभेटी, सभा, कॉर्नर सभा व शक्तीप्रदर्शन अशा विविध माध्यमांतून सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र यावेळी मतदार अधिक जागरूक दिसून येत असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता सुशिक्षित, तरुण, होतकरू आणि कर्तव्यदक्ष उमेदवारांनाच संधी देण्याचा ठाम मानस मतदारांमध्ये दिसून येत आहे. Chandrapur Municipal Elections 2026

‘लाडक्या बहिणी’ चे पैसे… भाजपाचे आंदोलन

प्रभाग क्रमांक १३ मध्ये हीच चर्चा सध्या केंद्रस्थानी आहे. या प्रभागातून एक उमेदवार महानगरपालिकेतील घंटागाडी कामगार असून एक महिला उमेदवार आणि एक पुरुष असे दोन उमेदवार  कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार तरुण असून त्यांच्या पॅनलमधील एक उमेदवार यापूर्वी तब्बल चार वेळा नगरसेवकपद भूषवलेला आहे. हे चौघेही उमेदवार बहुजन समाज पार्टीकडून एका पॅनलमध्ये निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

स्वतःच्या पक्षाशी गद्दारी केलेले… – खा. प्रतिभा धानोरकर

प्रभाग क्रमांक १३ मधील ‘अ’ गटातून घंटागाडी कामगार रतन गायकवाड हे ‘हत्ती’ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. गायकवाड यांनी महानगरपालिकेतील घंटागाडी कामगारांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांसाठी तसेच किमान वेतनासाठी वेळोवेळी महानगरपालिकेसमोर आंदोलन करून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. स्वतः कामगार असूनही कामगारांच्या हितासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या या तरुण उमेदवाराची प्रभागात जोरदार चर्चा असून ते निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात आहेत.

तसेच ‘ब’ गट (महिला राखीव) मधून सोनिया प्रशांत उंदीरवाडे आणि ‘ड’ गटातून पवन कुंभारे हे दोघेही बहुजन समाज पार्टीचे उमेदवार असून ते कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित आहेत. सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, तरुण, सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष उमेदवार म्हणून त्यांच्याकडेही मतदारांचा सकारात्मक कल दिसून येत आहे. याच पॅनलमध्ये ‘क’ गटातून चार वेळा नगरसेवक राहिलेल्या पुष्पा मून या देखील निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक १३ मधील मतदारांमध्ये यावेळी “सामान्य माणसाला महानगरपालिकेत पाठवायचे” अशी स्पष्ट भावना दिसून येत असून कामगार आणि सामान्य व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले उमेदवार इतिहास घडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, घंटागाडी कामगार रतन गायकवाड तसेच कॅटरिंग व्यवसायातील सोनिया प्रशांत उंदीरवाडे आणि पवन कुंभारे यांना मतदार किती कौल देतात, हे येणारा निकालच ठरवणार आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular