Women should rise high in the field of sports – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- चुल व मुल हि संकल्पना आता महिलांच्या बाबतीत मागे पडली असून महिला प्रत्येक क्षेत्रात आज समोर पाऊल टाकत आहे. भविष्यात देखील क्रिडा क्षेत्र महिलांनी गाजवावे असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी श्याम नगर, चंद्रपूर येथे आयोजित महिलांच्या कबड्डी स्पर्धे दरम्यान व्यक्त केले. Women should rise high in the field of sports
महिला शक्त बहुउद्देशीय संस्थे तर्फे श्याम नगर येथे महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या.
महिलांना संबोधित करतांना खासदार धानोरकर म्हणाल्या की, महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी क्रिडा क्षेत्र देखील गाजवावे. क्रिडा प्रकारातून शाररीक विकास साधत आरोग्य निरोगी देखील बनवावे. शासनाने महिलांना समसमान संधी दिली आहे, त्याचा पुर्णपणे वापर करुन सर्व क्षेत्रात यश संपादन करावे. यावेळी उपस्थित सर्व महिला स्पर्धकांना शुभेच्छा देऊन जिंकण्याची जिद्द मनाशी बाळगा असा संदेश देखील खासदार धानोरकर यांनी महिलांना दिला.
यावेळी मंचावर महिला शक्ती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच इंदिरा नगर प्रभागाच्या माजी नगरसेवीका संगीता भोयर, माजी नगर सेवक अमजद अली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.



