Saturday, January 24, 2026
HomeEducationalशरदराव पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन.

शरदराव पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन.

Inauguration of National Service Scheme Camp of Sharadrao Pawar College

चंद्रपूर :- राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोलाची मदत होते असे प्रतिपादन शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे यांनी केले.

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित शरदराव पवार महाविद्यालयाच्या वतीने कोरपना तालुक्यातील बीबी या ग्रामस्थळी सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. सदर शिबिर ‘युथ फॉर माय भारत’ व ‘युथ फार डिजिटल लिटरसी’ या संकल्पनेवर आधारित आहे.

शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अटबाले होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीरामजी पुजेकर, संस्थेचे संचालक माधवराव मंदे, नोगराज मंगरूळकर, महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, बीबी येथील सरपंच सौ .माधुरी ताई टेकाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.Inauguration of National Service Scheme Camp of Sharadrao Pawar College

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांनी केले त्यांनी शिबिराबाबत आपली भूमिका विशद केले, ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी भूमिका मांडली. उपस्थित प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांनी केले. तर आभार सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. माया मसराम यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबिरात सहभागी स्वयंसेवक व ग्रामस्थ तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत बीबीचे सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular