Sunday, September 6, 2026
HomeCulturalअहीर गवळी समाजाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चंद्रपुरात भव्य शोभायात्रा

अहीर गवळी समाजाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चंद्रपुरात भव्य शोभायात्रा

चंद्रपूर :- अहीर गवळी युवक संघटना व अहीर गवळी समाज बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 5 सप्टेंबर, 2026 रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त चंद्रपूर शहरातून भव्य शोभायात्रा काढून जन्माष्टमी साजरी केली. सदर शोभायात्रा बालाजी वार्डातील श्री हनूमान आखाडा गवळीपुरा चौक येथून बाळकृष्णाच्या  मुर्तीसह सजलेल्या पालखीतून काढण्यात आली. ही शोभायात्रा गांधी चौकजटपुरा गेट मार्गे कस्तुरबा चौकातुन संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज सभागृह येथे पालखीचे समारोप करण्यात आले. Grand procession organized by the Ahir Gawli community in Chandrapur

          या शोभायात्रेेचे शहरातील अनेक प्रतिष्ठान व नागरिकांनी स्वागत करून बाळकृष्णाच्या मुर्तीचे पुजन करुन आशिर्वाद घेतले. या शोभायात्रेमध्ये समाजाचे भुषण पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir व युवा नेते रघुवीर अहीर यांनी सहभागी होऊन या पालखीचे वहन केले. श्रीकृष्ण पालखीचे विधीवत पुजन करून त्यांनी सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. Shri Krishna Janmashtami

          शोभायात्रेमध्ये सर्वश्री हरीभैय्या अहीरअहीर समाजाचे अध्यक्ष बबन बाकरवालेचंद्रपूर कृ.उ.बा.समितीचे संचालक दयानंद बंकुवालेमोहन चौधरीजगदीश दंडेले यांचेसह युवकयुवती व समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

या शोभायात्रेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारीत विविध दृश्ये सादर करण्यात आली. शोभायात्रेनंतर गोपालकाला (महाप्रसाद) कार्यक्रम पार पडला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular