MPSC Judge the candidates.
MP Pratibha Dhanorkar’s request to the Chief Minister
चंद्रपूर :- एम.पी.एस.सी. लिपिक पदाची परीक्षेची जाहिरात जानेवारी 2023 रोजी प्रसिध्द होऊन जुलै 2024 रोजी कौशल्य चाचणी देखील पुर्ण होऊन अद्यापही नियुक्ती यादी जाहीर न झाल्याने खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे CM Eknath Shinde यांना पत्र लिहुन एम.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांना MPSC Examination तात्काळ न्याय देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.मागील 19 महिन्यांपासून एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांची लिपीक संवर्गातील Clerical Category परीक्षेतील विविध टप्पे पुर्ण केले आहे. अंतिम टप्प्यातील कौशल्य चाचणी पुर्ण झाली असून अद्यापही निकाल घोषित न झाल्याने संबंधित भरती प्रक्रीयेतील विद्यार्थ्यांनी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन निवेदन देत आपली समस्या मांडली.
यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून एम.पी.एस.सी. लिपीक संवर्गातील उमेदवारांची निवड यादी तात्काळ जाहीर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. अनेक उमेदवार अनेक वर्षांपासून अभ्यास करीत असून लवकर उमेदवारी जाहीर न झाल्याने वयोमर्यादा देखील ओलांडण्याची भिती उमेदवारांना आहे.
यासंदर्भात पुढील आठवड्यात खासदार प्रतिभा धानोरकर या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे उमेदवारांना सांगितले.