Saturday, January 17, 2026
HomeAssembly Electionवंचित चे सतीश मालेकर दाखल करणार २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज

वंचित चे सतीश मालेकर दाखल करणार २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज

Vanchit Bahujan Aghadi candidate Satish Muralidhar Malekar will file his nomination papers on October 28.

चंद्रपूर :- मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेचा आवाज व शिक्षकाचे लाडके नेतृत्व, ओबीसीच्या आरक्षणासाठी झटणारे व्यक्तिमत्व सतीश मुरलीधर मालेकर येत्या सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश मुरलीधर मालेकर सोमवारी सकाळी 9 ते 11 वाजता मुल येथील उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतील पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

यावेळी अर्ज भरण्यापूर्वी मालेकर मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन गांधी चौक मुल येथुन उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने व बाळासाहेबांच्या आशीर्वादाने निवडणुकीतही ते विजयासाठी सज्ज झाले आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular