Action taken against woman running prostitution business in residential area
4 victim women rescued
चंद्रपूर :- शहरातील जुनोना चौक परिसरात एक महिला राहते घरी महिलांकडून वेश्या व्यवसाय चालवीत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने Police Raid धाड टाकत महिलेवर कारवाई केली यात 4 पीडित महिलांची सुटका करीत त्यांना स्वाधारगृहात दाखल करण्यात आले. Action taken against woman running prostitution business
पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये विधानसभा निवडणुक – २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रनियम, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी पोलीस स्टेशन रामनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख, रा.जुनोना चौक, चंद्रपूर हि तिचे राहते घरी महिलाकडुन वेश्याव्यवसाय करीत आहे, अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये विशेष पोलीस अधिकारी महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि संतोष निंभोरकर, महिला व पुरूष अंमलदार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी समाजसेविका सरिता मालु रा. चंद्रपूर, बनावट गि-हाईक, पंचासह छापा टाकुन दलाल महिला आरोपी तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख, रा. जुनोना चौक, चंद्रपूर यांचेवर कायदेशीर कारवाई केली तसेच ४ पिडीत महिलाची सुटका करून त्यांना स्वधारगृह येथे दाखल करण्यात आले. Chandrapur Crime
पोलीस स्टेशन रामनगर येथे गु.र.नं – १.०.०.९/२०२४ कलम ३,४,५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहे. Local Crime Branch Chandrapur
सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात विशेष पोलीस अधिकारी महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, प्रमोद कोटनाके, चालक मिलिंद टेकाम, महिला अंमलदार उषा लेडांगे, अर्पणा मानकर, छाया निकोडे, दिपीका तसेच सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली.