Two Burglary Cases Solved, Gold Worth ₹16.80 Lakhs Seized
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून शेट्टी गँगशी संबंधित अट्टल घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सावली व मुल परिसरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून तब्बल ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे १६ लाख ८० हजार रुपये) जप्त करण्यात आले आहेत. Hardened Criminal Apprehended; Two Burglary Cases Solved
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन सावली यांच्या संयुक्त पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर येथे सापळा रचण्यात आला. यावेळी शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी (रा. चंद्रपूर, सध्या दिघोरी, नागपूर) यास ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीने सावली पोलीस स्टेशनमधील अपराध क्र. १०७/२०२६ व मुल पोलीस स्टेशनमधील अपराध क्र. २५२/२०२५ या घरफोडी प्रकरणांमध्ये आपला सहभाग कबूल केला. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने नागपूरमधील तीन वेगवेगळ्या सोनारांकडे विक्री केल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. Chandrapur Local Crime Branch
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील सपोनि दिपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सचिन मुसळे, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, सुरेंद्र मंहतो, मोहन दासरवार,
पोअं गोपिनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, अजित शेन्डे, सुमित बरडे,
धिरज पिदुरकर, अशोक मडावी, मिलींद टेकाम, गजानन मडावी तसेच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन सावली येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली.