Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeSocialभूषण फुसे यांनी जिंकलीत मने : त्यांचा 'या' उपक्रमाची होतेय चर्चा

भूषण फुसे यांनी जिंकलीत मने : त्यांचा ‘या’ उपक्रमाची होतेय चर्चा

Bhushan Phuse wins hearts: his initiative is being discussed

चंद्रपूर :- सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे Bhushan Fuse यांनी वाढदिवसाच्या निमित्याने आगळावेगळा उपक्रम राबवीला. राजुरा विधानसभा Rajura Assembly क्षेत्रातील धार्मिक स्थळाना भेटी दिल्यात. रुग्णांना फळ वाटप केले. शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. विधानसभेतील अनेक गावातील समर्थकांनी विविध उपक्रम राबविलेत.

राजुरा विधानसभेतील अनेक प्रश्नांना आंदोलनाच्या माध्यमातून भूषण फुसे यांनी वाचा फोडली आहे. जीवती, कोरपना, गोंडपिपरी, राजुरा तालुक्यात त्यांचा समर्थकांची संख्या मोठी आहे.

नुकतेच 1 ऑगस्ट रोजी भूषण फुसे यांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. विविध धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्यात. विविध ठिकाणी त्यांचा समर्थकांनी वृक्षारोपण केले. गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. करंजी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. गडचांदूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर, संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर कमिटी तर्फे भूषण फुसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती.

अनोखे उपक्रम...

गोंडपिपरी तालुक्यातील जोगापूर येथील गुरुद्वारा येथे फुसे यांनी दर्शन घेतले. जोगापूर गुरुद्वारा कमिटीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. पंचशील बुद्ध विहार गोडपिंपरी येथील भंतेजींना चिवरदान केले. राम मंदिर गोंडपिपरी येथे दर्शन केले. करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन्सिलचे वाटप. विध्यार्थाना नव्याकोऱ्या चप्पलाचे वाटप केले. शासकीय रुग्णालय गोंडपिपरी येथे फळ व नवजात शिशूंची किट वाटप करण्यात आली.

फुसे यांनी स्वतःच्या हाताने चिमुकलांना चपला घालून दिल्या. हे क्षण बघताच सर्व चिमुकले व त्यांचे पालक तसेच शिक्षक भावनिक झाले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular