Seized cattle smuggling bolero pickup vehicle
चंद्रपूर :- पोलीस स्टेशन लाठी अंतर्गत नाकाबंदी करीत गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला अटक करून 8 जनावरांची सुटका करीत दोन आरोपीना अटक करीत 80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. cattle smuggling
दिनांक 3 ऑगस्ट रोजी अवैध्यरित्या कत्तलीकरीता जनावरांना कोंबून चारचाकी वाहनाने वाहतूक करीत असल्याची माहिती Lathi Police Station लाठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना प्राप्त झाली या खबरे वरून पो.स्टे.लाठी येथील स.पो.नि. युवराज सहारे व अंमलदार यांनी सक्कनुर जुना कोळसा मार्गावर नाकाबंदी केली असता एक बोलेरो पिकअप क्र. MH 34 BZ 4260 वाहन आले, वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये एकूण 8 बैल आढळले याची किमत 80,000 रुपये, सदर गोवंशी जनावर कोंबून अवैध्यरित्या कत्तली करीता तेलंगाना राज्यात घेवून जातांना मिळून आले. वाहन चालक मंगेश शामराव चौधरी वय 29 वर्षे व तुळशिराम बुद्धाजी गुरनूले वय 27 वर्षे दोन्ही रा.रेड्डीगुडा लक्कडकोट ता.राजूरा जि. चंद्रपूर यांचेवर पो.स्टे. लाठी येथे कलम 5 (अ) (ब), 9, 11 महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा 1976 सुधारणा 2015 सह कलम 11(1) (ड) (ट) प्राण्यांना निर्देयतेने वागविण्याचा कायदा 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास पोलीस स्टेशन लाठी करीत आहेत.