On the day of Mahaparinirvana Tribute to Dr. Babasaheb Ambedkar
चंद्रपुर :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी सर्वत्र साजरी केली जात असून समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. भीमराव आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. हाच दिवस संपूर्ण भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तसेच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी आज ग्रा. पं. उर्जानगर कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहत विनम्र अभिवादन करुन दुर्गापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले.
तसेच दुर्गापुर येथून गांधी चौक, चंद्रपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करीत अभिवादन करण्याकरीता निघालेल्या भव्य रैलीत सहभागी होवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.