Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day at Kamladevi Education College
चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी बार्ड, चंद्रपूर येथे दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमूख मार्गदर्शक म्हणून अॅड. शंकरराव डी. सागोरे सर व अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ. हेमकांत वाकडे कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर यांनी स्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका वनिता हलकरे, ग्रंथपाल श्री. चंदन जगताप उपस्थित होते.
मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीमेस माल्यार्पण करून अभिवादन केले, सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राध्यापक राजकूमार भगत यांनी असे सांगितले की, जो पर्यन्त समाजातील विषमता दूर होणार नाही तो पर्यन्त जातीभेद नष्ट होणार नाही. तसेच आर्थिक व सामाजिक लोकशाही असेल तरच राजकीय लोकशाही यशस्वी होईल असे
सांगितले व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रमूख मार्गदर्शक मान. अॅड. शंकरराव डी. सागोरे सर यांनी समाजामध्ये विविध जाती असून जातीजाती मध्ये असणारा भेद कमी करण्यासाठी सामाजिक कांती होणे गरजेचे आहे. तसेच स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधूता है संविधानातील आधारस्तंभ आहे. संविधानातील काही महत्वपूर्ण कलमाविषयी माहिती समजावून सांगितली तसेच प्रत्यक्ष जीवन जगतांना संविधानातील मुल्याचे पालन करायला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. हेमकांत वाकडे सर यांनी बौध्द बंबामधील महापरिनिर्वाण म्हणजे मृत्युनंतरची मूक्ती जन्म आणि मृत्युच्या चकातून मुक्तीचे प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ आदरणीय नेतेच नव्हते तर एक विचारवंत आणि सूधारक देखील होते ज्यांनी समतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि जाती आधारित भेदभाव निर्मुलनासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांनी शोषितांना सशक्त करण्यासाठी शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आरक्षणाचा पुरस्कार केला असे सांगितले. बी.एड्. प्रथम वर्षीय छात्रध्यापिका गायत्री पिसे यांनी बाबासाहेब आबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले तसेच भैरवी लाडे यांनी बाबासाहेबाचे शैक्षणिक विचार
मांडले व वैभवी मडावी, वितीजा मानकर, मनिषा भोयर यांनी सूविचार सांगितले. प्रथम वर्षीय छात्राध्यापक महेंद्र दत्ता यांनी
जीवनातील प्रत्यक्ष आलेले अनुभव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारेवर प्रकाश टाकला. तसेच या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन द्वितीय वर्षीय छात्रध्यापिका गौतमी रायपूरे व आभार प्रदर्शन प्रियंका चिवंडे यांनी केले.
सदर कार्यक्रमात प्राध्यापिका सूचिता खोब्रागडे, प्राध्यापिका अश्विनी सातपूडके, प्राध्यापिका डॉ. जयमाला माटे, प्राध्यापिका डॉ. प्रगती बच्चूवार, प्राध्यापिका शमिना अली, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग श्री. मोरेश्वर गाऊजे, श्री. विजय बाळबुधे तसेच बी. एड. अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक उपस्थित होते.



