Forget differences and start working vigorously: Subhash Dhote.
चंद्रपूर :- नगरपंचायत जिवती समोरील बंजारा भवन येथे काँग्रेस तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या वतीने कार्यकर्ता चिंतन बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच सोबत असलेल्या सर्व मतदारांचे आभार मानले तसेच जिवती तालुक्यात झालेल्या मतदानाचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विधानसभेत अनेक गैरप्रकार, पैसाचा भडीमार झाल्याने अगदी थोड्याशा फरकाने झालेल्या आपल्या पराभवामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत मात्र यातून बाहेर पडून आता पुढे वाटचाल करताना सर्व कार्यकर्त्यांनी आपआपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे आणि पून्हा आपली सत्ता स्थापन करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले. A thought meeting of Congress and Mahavikas Aghadi concluded at Jivati.
यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, डॉ. अंकुश गोतावडे, राष्ट्रवादी चे अमर राठोड, शिवसेना चे कैलास राठोड, काँग्रेसचे माधव डोईफोडे, भोजू कोटनाके, देविदास साबणे, सुधाकर नागोसे, बंडू राठोड, अश्फाक शेख, शिवाजी श्रीरामे, सिताराम मडावी, बाळू पतंगे, माधव शेंबडे, विजय बनसोडे, नंदाताई मुसने, प्रशांत कांबळे, राहुल गायकांबळे, प्रदीप काळे, विजय बनसोडे, गणेश वाघमारे, बालाजी गोटमवाड, अमोल कांबळे, शब्बीर भाई, ताजुद्दीन शेख, वजीर सय्यद, आशिष डसाने, कुमरे पाटील यासह काँग्रेस तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.