Ramnagar police caught the motorcycle thief, 9 motorcycles seized
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात होणाऱ्या वाहन चोरीचा तपास करतांना रामनगर पोलिसांनी तब्बल 9 मोटर सायकलसह चोरट्याला अटक केली आहे. Motor Cycle Theft arrested
चंद्रपूर शहरात होणाऱ्या वाहन चोरीवर प्रतिबंध करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी निर्देशीत केले. त्यानुसार रामनगर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी शोध पथकातील अधिकाऱ्यांना आदेशीत केले. Ramnagar Police Station
रामनगर गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कपिल मेश्राम रा. फुकटनगर, राजीव गांधी नगर चंद्रपूर याचा शोध घेणे सुरु केले, आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत होता दरम्यान पोलीस सतत त्याच्या मागावर राहून आज दिनांक 21 जानेवारी रोजी ताब्यात घेऊन अटक केली, आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतून तब्बल 9 मोटर सायकल चोरीची कबुली दिली त्याचेकडून होंडा कंपनीची प्लेझर मोपेड एम एच 34 V 6289 या वाहनसह अन्य 8 वाहन असा एकूण 4,08,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Chandrapur Crime
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार डेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे



