Saturday, January 18, 2025
HomeCrimeरेकॉर्ड वरील आरोपी कडून तलवार जप्त

रेकॉर्ड वरील आरोपी कडून तलवार जप्त

Sword seized from accused on record       Local Crime Branch action

चंद्रपूर :- जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे दरम्यान चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने LCB धाड टाकीत रेकॉर्ड वरील आरोपीच्या घरून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. Chandrapur Crime News

चंद्रपूर जिल्हा पोलीस यांच्या विशेष मोहिमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पथकाने घुग्गुस येथील रेकॉर्ड वरील आरोपीच्या घरी गोपनीय माहितीच्या आधारे police Raid आरोपी अनिल गोगला (23 वर्ष) रा. घुग्गुस याला ताब्यात घेत घराची झडती घेतली असता घरात एक टोकदार धारदार तलवार आढळून आली यावरून भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाकरीता आरोपीला घुग्गुस पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. Sword seized from accused on record

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पो उपनि विनोद भुरले, पोहवा रजनीकांत पुट्टावार, सतीश अवथरे, किशोर वैरागडे, गोपाल अतकूलवार, संतोष येलपुलवार आदी स्था. गु. शा. पथकाने केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular