Ashish Masirkar’s Goodwill Gift to Tagore Ganesh Mandal: Prizes for Home Ganesha Decorations
चंद्रपूर :- गणेशोत्सव सुरु झाला, विविध गणेश मंडळानी आपल्या बाप्पांची विविध स्वरूपात मूर्ती स्थापन केली आहे दरम्यान प्रवृत्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आशिष मासीरकर यांनी आज विठ्ठल मंदिर वार्डातील टागोर गणेश मंडळाला भेट देत बाप्पांचे दर्शन घेतले.
आपल्या सामाजिक कार्याने सुपरिचित असलेले आशिष मासीरकर नेहमीच जनमाणसांच्या संपर्कात असतात, त्यांनी गणेशोत्सव पर्वात घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे यात गणेश भक्तांनी आपल्या घरी स्थापन केलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची सजावटीचा फोटो पाठवायचा आहे, यात Pravrutti Foundation प्रवृत्ती फाउंडेशन चे सदस्य सजावटीची पाहणी करून मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात येणार आहेत. Prizes for Home Ganesha Decorations
याआधी मासीरकर यांनी बाळ गोपाळाना प्रोत्साहन मिळावे याकरिता तान्हा पोळा महोत्सवात विविध मंडळाच्या साहाय्याने बक्षिसे वितरित केली आहेत.