Friday, April 17, 2026
HomeAgricultureकृषी महाविद्यालयात महिला शेतकऱ्याकरिता शाश्वत शेती कार्यशाळा संपन्न

कृषी महाविद्यालयात महिला शेतकऱ्याकरिता शाश्वत शेती कार्यशाळा संपन्न

A sustainable agriculture workshop for women farmers was held in the College of Agriculture

चंद्रपूर :- हवामान अनुकूलन व शाश्वत शेती, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली यांच्या अंतर्गत जागृत महिला समाज संस्था बल्लारपूर च्या महिला सदस्या करिता एकदिवसीय शाश्वत शेती कार्यशाळेचे आयोजन आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 21 मार्च 2025 रोजी करण्यात आले. sustainable agriculture workshop for women farmers

सदर कार्यशाळेमध्ये शाश्वत शेती व सेंद्रिय खतांचे महत्त्व, बियाणे निवड व संवर्धन, जैविक कीड नियंत्रण पद्धती, जैविक खतांचे व्यवस्थापन व पिकावरील रोग नियंत्रण पद्धती इत्यादी विषयावर अनुक्रमे सौ वैशाली पुसदेकर, डॉ अश्विनी मानकर, डॉ स्वाती लोनाग्रे, डॉ प्रशांत राखोंडे यांनी मार्गदर्शन केले. बनावटी सोने विक्रीची आंतरराज्यीय टोळी गजाआड

कार्यशाळेमधे प्रात्यक्षिक दाखवण्याकरिता Anand Niketan Agricultural College Anandwan Warora महाविद्यालयाच्या जैविक निविष्ठा उत्पादन प्रयोगशाळा, जैविक खते प्रयोगशाळा प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिकांच्या रोजगारासाठी WCL ने पुढाकार घ्यावा

सदर कार्यशाळेचे आयोजन जागृत महिला समाज संस्था बल्लारपूर च्या सौ संध्या लाबादकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular