WCL should take initiative for employment of locals – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून अनेक युवक रोजगाराच्या संधी शोधत आहेत. चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त करण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी पुढाकार घेतला असून वेकोली च्या अध्यक्षांना पत्र लिहित स्थानिकांच्या रोजगारासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. WCL should take initiative for employment of locals
चंद्रपूर व यवतमाळ हे दोन्ही जिल्ह्ये औद्यागीक जिल्ह्ये म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी वेकोलिच्या अनेक खाणी अस्तित्वात आहेत. यामध्ये स्थानिक युवकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगार मिळत नसल्याची बाब खासदार धानोरकर यांनी गांर्भीयाने घेतली असून स्थानिक युवकांना वेकोली अंतर्गत रोजगार मिळण्याकरीता आधुनिक जड वाहने, वोल्वो ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, ग्रेडर ऑपरेटर त्यासोबत इतर अत्याधुनिक यांत्रिकी उपकरणाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याकरीता वेकोलीशी पत्र व्यवहार केला आहे. बनावटी सोने विक्रीची आंतर राज्यीय टोळी जेरबंद
स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता वेकोली WCL कडे असणाऱ्या सामाजिक दायीत्व निधीतून प्रशिक्षण केंद्र उभारण्यीच मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांचा अवमान करणाऱ्या कुणाल कामरा वर कारवाई करा
सद्यस्थितित बाहेरील राज्यातील आधुनिक जड वाहने, वोल्वो ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, ग्रेडर ऑपरेटर येऊन काम करीत असल्याने स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
या संदर्भात खासदार धानोरकर यांनी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन सदर प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरीता वेकोली कडे पाठपूरावा करणार असल्याचे सांगितले.
प्रशिक्षण केंद्र Training Centers उभारल्यास Chandrapur चंद्रपूर व यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
