Monday, May 11, 2026
HomeCrimeबनावटी सोने विक्रीची आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

बनावटी सोने विक्रीची आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Inter-state gang busted for selling fake gold

चंद्रपूर :- बनावटी सोने विक्री करून सर्व सामान्यांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी शहरात सक्रिय कार्यरत असतांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून या आंतरराज्यीय टोळीला गजाआड केले, यात 3 पुरुष आरोपी तर महिला सुद्धा सामील आहे. यावेळी पोलिसांनी सोन्याचे मणी, बनावटी माळ, 2 मोबाईल असा एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Inter-state gang busted for selling fake gold

असली सोन्याचे मणी दाखवून बनावटी सोन्याची विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी चंद्रपूर शहरात सराफा व्यापाऱ्यांसह इतरांची फसवणूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराफा व्यवसायिकांना याची माहिती देत असतांना छोटा बाजार येथील जया कलेक्शन चे संचालक राकेश मंथानी यांचेकडे काही वेळेआधी 3 इसम व 1 महिला सोने विक्री करिता आले असून त्यांनी सोन्याचे मणी दाखवून, सोन्याची माळ 20 लाखात विकणार असून त्यांचेकडे 1 किलो सोने असल्याचे त्यांनी सांगितले. Chandrapur Local Crime Branch action


यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून सदर चारही इसम पुन्हा आले असता पंचासमक्ष आरोपी अतुल उर्फ मुखी बनाराम परमार (39 वर्ष) आग्रा उत्तर प्रदेश, शत्रुघ्न सीताराम सोलंकी (40 वर्ष) आग्रा उत्तर प्रदेश, पुरण प्रेमचंद बघेल (38 वर्ष) रा. दुर्ग छत्तीसगड व लक्ष्मी सेवाराम राठोड (55 वर्ष) रा. फिरोजाबाद, हल्ली मुक्कामी आग्रा उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून 4 नग असली सोन्याचे मणी वजन 1.5 मिलीग्रॅम किंमत 15000 रुपये, पिवळ्या धातूचे बनावटी मनीची माळ (नकली सोन्याची माळ), दोन मोबाईल असा एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्वोदय विचार देशाच्या काना कोपऱ्यात पोहचविण्याचा प्रयत्न
चारही आरोपीविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपुर, रिना जनबंधु अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/किशोर वैरागडे, दिपक डोंगरे, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्‌ठवार, निराशा, अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular