Friday, March 21, 2025
HomeCrimeघरफोडीच्या अट्टल गुन्हेगाराला अटक : रामनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई

घरफोडीच्या अट्टल गुन्हेगाराला अटक : रामनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई

staunch burglar arrested
Action of Ramnagar Crime Investigation Team

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील सरकार नगर परिसरातील एका घरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने Ramnagar Police DB Squad कौशल्यपूर्ण तपास करीत अटक केली यात आरोपीकडून नगदी रक्कम, सोने चांदीचे दागिणे असा एकूण 2,57,740 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Burglary Crime

शहरातील सरकार नगर, अरविंद नगर येथील रहिवासी अजय चंपालाल जयस्वाल हे दिनांक 26 जुलै रोजी रात्रौ झोपले असता पहाटे जाग आली असता कोणीतरी अज्ञात इसमाने घराचा ऑटो लॉक तोडुन बरात प्रवेश करून बेडरूम मधिल लोखंडी कपाटात ठेवलेले नगदी रोख रक्कम, सोन्याचे डोरले, छोटया सोन्याचे अंगठया, एक जोड सोन्याचे कानातले टॉप्स, एक सोन्याचे चैन असा एकुण 5,22,000 रुपयांचा ऐवज चोरी झाला अशी तक्रार त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. Chandrapur Today Crime

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक गुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, वरिष्ठ पालीस निरीक्षक सुनिल गाडे पोस्टें रामनगर यांनी स्वतः गुन्हे शोध पथकासह घटनास्थळावर जात आरोपी शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
गुन्हे शोध पथकातील पो उप नि मधुकर सामलवार अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासून कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी रमेश उर्फ शेट वेलादन शे‌ट्टी वय 49 वर्ष, रा. इंदिरा नगर, रेल्वे पट्टी जवळ, चंद्रपुर यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
यावरून आरोपीला अटक करीत आरोपी जवळून दोन छोटी सोन्याची अंगठी अंदाजे वजन 5 ग्रॅम 18000 रुपये, नगदी रोख रक्कम 1,70,000 रुपये, एक सोन्याने डोरले असलेल्या काळया मण्याचे मंगळसुत्र अंदाजे १५ ग्रॅम वजनाचे किंमत 45000 रुपये, एक सोन्याये अंगठी 9000 रुपये, एक जोड सौन्याचे कानातले टॉप्स 5100 रुपये, एक सोन्याचे चैन 11460 रुपये व एक लोखंडी सलाख असा एकूण 2,57, 740 रुपयांचा मुद्‌देमाल हस्थगत करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पो.नि. यशवंत कदम, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे सपोनी देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलबार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे, लालु यादव, हिरालाल गुप्ता, रविकुमार डेंगळे, प्रफुल पुप्यत्वार, संदीप कामड़ी, विकास जुमनाके, विकास जाधव, पंकज ठोंबरे, मनिषा मोरे यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular