Regularize water supply in Chandrapur city, Ghagar Morcha on Municipal Corporation
चंद्रपूर :- शहरात होणाऱ्या अनियमित व दूषित पाणीपुरवठा यामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्या नेतृत्वाखाली महानगर पालिकेवर आज घागर मोर्चा काढण्यात आला. Ghagar Morcha on Chandrapur Municipal Corporation https://youtu.be/X6L_XyRTm6U?si=Lgo_j878EtZSgvuI
शहरात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जातो, मात्र गेल्या काही दिवसांपासून एक दिवसा आड होणारा पाणीपुरवठा अनियमित असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. ऐन पावसाळ्यात हा त्रास होत असल्याने नागरिक त्रस्त झाली आहे. शिवाय जो पाणीपुरवठा होतो तोही दूषित होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यला धोका येण्याची भीती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभाग एक दिवस आड पाणी पुरवठा करतो मात्र बिल नियमितपणे वसूल करतो, हा प्रकार अन्यायकारक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमितपणे व तोही स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात करण्यात यावा या विषयाअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली. Regularize water supply in Chandrapu City https://youtu.be/X6L_XyRTm6U?si=Lgo_j878EtZSgvuI
चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर पाण्यासंबंधी समस्येचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
निवेदन देते वेळेस शिष्टमंडळामध्ये माजी नगरसेवक वसंता भाऊ देशमुख, लता ताई बंडू जांगडे, प्रकाश चंदनखेडे, हाजी सय्यद हारून, मोनू रामटेके, सरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम, मोहम्मद इरफान शेख आदी सह चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांचा समावेश होता.