Shiv Sena’s Shinde group became politically heated over the post of district head of the medical aid cell
District office bearers in Chandrapur are on the way to resign due to conspiracy
चंद्रपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात Shivsena (Babasaheb Thakre) पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न पक्षश्रेष्ठीकडून सुरू असताना गेल्या दोन वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाच्या सहाय्याने आरोग्यासंदर्भातील समस्येचे निराकरण करीत असलेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अरविंद धिमान यांची उचलबांगळी करुन चंद्रपुर उप तालुका प्रमुखाची नियुक्ति वरोरा जिल्हाप्रमुखांनी वरिष्ठ पदाधिकारी यांची दिशाभूल करुन खोटी माहिती देवून करण्यात आली. त्यामुळे चंद्रपुरातील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या खच्चीकरणाचा हा डाव असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पुरुष, महिला व युवा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.
शिवसेना गटातून दोन जिल्हाप्रमुख चंद्रपूर जिल्ह्याला लाभले असून जिल्ह्यात आरोग्यासंदर्भातील जनतेच्या समस्येचे निराकरण करुन बर्यापैकी पक्ष वाढीसाठी प्रयत्नही केले जात आहे. मात्र काही पदाधिकार्यांना पदावरून डावल्याण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षातील काही पदाधिकार्यांकडून केल्या जात आहे. त्यामुळे शिवेसना गटात वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावरून राजकारण तापल्याची चर्चा दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र असून यात वैद्यकीय मदत कक्षाचे दोन जिल्हाप्रमुख आधीपासून कार्यरत असतांना याच पदासाठी वरोरा जिल्हाप्रमुखांनी पुन्हा एकाची नियुक्तीसाठी प्रयत्न केल्याने शिवसेना शिंदे गटात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अरविंद धिमान हे गेल्या दोन वर्षापासून चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा या क्षेत्रात आपली कामगीरी बजावत आहे. तर दिपक कामतवार यांच्याकडे चिमूर, ब्रम्हपूरी, राजूरा हे विधानसभा क्षेत्र दिले असताना पुन्हा एका वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुखपदी उप तालुका प्रमुख अविनाश उके यांची नियुक्ती केल्याने शिवसेना शिंदे गटात चांगलचे राजकारण तापलेले दिसून येत आहे.
जेव्हा की चंद्रपूर, बल्लारपूर- वरोरा क्षेत्र अगोदर दिल्याचे असतांना देखील याच क्षेत्राची नियुक्ती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख (महाराष्ट्र राज्य) राम हरी राऊत यांना चंद्रपूर जिल्हाप्रमुखानी दिलेल्या शिफारशीवरून केली आहे. अविनाश उके हे आधी उपतालुका प्रमुख म्हणून जि.प.क्षेत्र म्हणून त्यांच्याकडे ताडाली, पडोली हे क्षेत्र होते. मात्र आता त्यांना चंद्रपूर -बल्लारपूर -वरोरा या विधानसभा क्षेत्राच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
त्यामुळे अरविंद धिमान यांना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टीत तर केली नाही ना ? असा प्रश्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असल्याचे दिसून येत आहे. अरविंद धिमान हे पक्षाशी एकनिष्ठ राहुन काम करीत असताना कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांना पदावरून काढण्याचा डाव आखल्याने पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकापुर्वी जर एकमेकात अंतर्गत राजकारण सुरू राहीले तर पक्ष वाढीसाठी ब्रेक लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. अरविंद धिमान यांच्या पदावरून राजकारण केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली जात असल्याची चर्चा आता उमटू लागली आहे. यावर पक्षश्रेष्ठीने योग्य ती चौकशी करून नियुक्त्या द्यावे जेणेकरून राजकारणात एकमेकांप्रती कलह निर्माण होणार नाही आणि पक्षाचेही खच्चीकरण होणार नाही. असे जनसामान्य कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.