Social activist Anutai Dahegaonkar inaugurated the five-day sports festival hockey tournament
पाच दिवसीय क्रिडापर्व हॉकी स्पर्धेचे अनुताई दहेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपूर :- डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्यूकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर च्या वतीने हॉकीचे जादूगार मेयर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त 5 दिवसीय क्रिडापर्व हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यँत पाच दिवस चालणाऱ्या क्रीडा पर्वाचे आज रयतवारी कॉलरी स्टेडियम चंद्रपूर येथे सामाजिक कार्यकर्त्या अनुताई दहेगावकर यांच्या हस्ते उदघाट्न करून क्रीडा पर्वाची सुरुवात करण्यात आली. five-day sports festival hockey tournament
यावेळी अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हॉकी असोसिएशन चे सचिव रुपेश चव्हाण, हॉकी खेळाडू निलेश ठाकरे, ड्रीम चे कोषाध्यक्ष निलेश शेंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्घाटनिय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना अनुताई दहेगावकर यांनी शारीरिक खेळाचे महत्व विषद केले, त्या म्हणाल्या कि, खेळामुळे उत्तम आरोग्य, सुदृढ शरीर आणी सामाजिक शर्यतीत जिंकण्याचे बळ निर्माण करते तसेच शिस्त, अनुशासन व वेळेचे बंधन पाळण्याचे तंत्र अवगत करते त्यामुळे तरुणांनी शिक्षणा बरोबरच क्रीडा स्पर्धेत ही सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन केले. Social activist Anutai Dahegaonkar inaugurated the five-day sports festival
यावेळी उपेशकुमार खैरे, उमेश मांडवकर, पंकज शेंडे, पांडुरंग झोडे, राजलिंगु गोदारी, सादीक शेख, कुंदन देवाडकर, कुमार मेश्राम, गुरु भगत, प्रशांत शिंदे, महावीर यादव, शुभम साखरे, शुभम पुणेकर, आकाश इंगळे, मनिष जयस्वाल, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसाकडे, हर्षल वरारकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, सोनाली गावंडे, आईशा शेख, दीक्षा चुनारकर, प्रियंका मंडल, श्रुती भारती, शर्वरी लभाने, करिश्मा राजपुत, निधी झाडे, कोमल कुवर, हर्षदा टेकाम, कोमल चौधरी, सानिका पाकुलवार, समृद्धी गेडाम आदी खेळाडूंची उपस्थिती होती.