Society should send activists of movement from reserved constituencies to assembly – Rajkumar Jawade
चंद्रपूर :- अनुसूचित जातीच्या राखीव मतदार संघातून समाजाने बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रामाणिकपणे कार्य केलेल्या आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या खऱ्या लोकप्रतिनिधींना विधानसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे असे प्रतिपादन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे BEF राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांनी केले. उरुवेला चैत्यगृह येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
अनुसूचित जाती जमाती मध्ये दिवसेंदिवस शैक्षणिक आणि रोजगाराच्या समस्या वाढीस लागलेले आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा या समूहाला अजून पर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता समाजाच्या दुःखाची जाण असलेला कार्यकर्ता म्हणजेच आपला खरा प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे.
अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रतिनिधी इतर प्रस्थापित पक्षांकडून सभागृहांमध्ये जातात. परंतु समाजाच्या कल्याणाकरिता व समाजावर झालेल्या अन्यायाचा विरोध करण्याकरिता शब्दही सभागृहामध्ये काढत नसतात. यामुळे समाजाचे अतोनात नुकसान झालेले आहे. ते भरून काढायचे असेल तर आपल्या खरा प्रतिनिधी सभागृहामध्ये गेला पाहिजे. असा निश्चय अनुसूचित जाती आणि जमातीच्या राखीव मतदार संघातील जनतेने केला पाहिजे यातच आपले सर्वांचे कल्याण आहे. आंबेडकरी चळवळीच्या अनेक राजकीय पार्ट्या ही आपली खरी समस्या नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला प्रतिनिधी समाजाने द्यावा हा यावर एक मात्र उपाय आहे असेही राजकुमार जवादे म्हणाले. Movement activists should be sent from reserved constituencies to the Legislative Assembly
लोकशाहीला मजबूत करण्याकरिता आपण आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे असे प्रतिपादन एड. राजेश बनकर, प्रा. डॉ. टि. डी. कोसे व दिलीप वावरे यांन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष शेंद्रे यांनी केले तर आभार पुष्प पाझारे यांनी मानले.
कार्यक्रमाला बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.