Congress dust throw movement against the administration
चंद्रपूर :- मागील महिन्याभरापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे चंद्रपूर शहरासह तुकूम परिसरातील रस्त्यांवर मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे आणी यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे करिता नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असून अनेक आजर नागरिकांना होऊ शकतात यामुळे प्रशासना विरोधात Congress इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांच्या नेतृत्वात एस टी वर्कशॉप चौकात ‘धूळ फेको आंदोलन’ करण्यात आले. Dust throw movement
सार्वजनिक बांधकाम विभागाने ट्रॅफिक ऑफिस ते एस टी वर्कशॉप चौकपर्यंत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, आज आम्ही आंदोलना दरम्यान आमच्या अंगावर रस्त्याची धूळ टाकली अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धूळ टाकणार असा ईशारा चंद्रपूर इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी यावेळी प्रशासनाला दिला.
धूळ फेक आंदोलनात काँग्रेस अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.