चंद्रपूर :- सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण १०१७.१ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या ६५.८ टक्के आहे. नागपूर विभागाच्या तुलनेतही जिल्ह्यात पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचे पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. Satisfactory rainfall in Chandrapur district in September
गणेश विसर्जनासाठी चंद्रपुर मनपा सज्ज…….
जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक १२४५.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी ११५१.४ मिमी, नागभीड ११६५.१ मिमी, सिंदेवाही ११४६.५ मिमी आणि गोंडपिंपरी ११२१.४ मिमी पाऊस झाला आहे.
ईमानदार मतदाता.. बेईमान चुनाव आयोग के कटघरे मे…….
सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी पाहता जिल्ह्याची सामान्य सरासरी १५०.३ मिमी असून, मागील दिवसापर्यंत १०३.३ मिमी पाऊस झाला होता. अहवालाच्या दिवशी ८.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे सप्टेंबरमधील प्रगतीशील पर्जन्यमान १११.७ मिमी, म्हणजेच सामान्य सरासरीच्या ७४.३ टक्के इतके झाले आहे.
सुप्रसिद्ध चरित्र अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन…….
बल्लारपूरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
बल्लारपूर तालुक्यात जूनपासून आतापर्यंत ११३९.८ मिमी पाऊस झाला असून, तालुक्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत हे ११० टक्के आहे. तसेच जिवतीमध्ये ६९१.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, सामान्य सरासरीच्या तुलनेत ९४.५ टक्के पाऊस झाला आहे.
दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याची सामान्य पर्जन्यमानाची सरासरी १०८४.० मिमी आहे. त्यापैकी ६९३.० मिमी प्रत्यक्ष पाऊस नोंदला गेला असून, सरासरीच्या ६३.९ टक्के पाऊस झाला आहे.
पर्जन्यमानाच्या या नोंदीमुळे खरीप हंगामातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, आगामी काळातील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
