Thursday, April 16, 2026
HomeEducationalइन्फंट काँन्व्हेंट येथे रोबोटिक्सचा जल्लोष

इन्फंट काँन्व्हेंट येथे रोबोटिक्सचा जल्लोष

Robotics Extravaganza at Infant Convent: Students Present Impressive, State-of-the-Art Projects

चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी, राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व तंत्रज्ञान कौशल्याला वाव देणारी रोबोटिक्स प्रदर्शनी उत्साहात पार पडली. Robotics Extravaganza at Infant Convent

इयत्ता ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांनी विविध आधुनिक व उपयुक्त रोबोटिक प्रकल्पांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या प्रदर्शनीत ‘रेन डिटेक्टर सेंसर फॉर क्लॉथ’, ‘स्मार्ट प्लांट हेल्थ मॉनिटर’, ‘दृष्टीहीनांसाठी स्मार्ट ब्लाइंड स्टिक’, ‘विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट अलार्म क्लॉक’, ‘स्मार्ट हेल्मेट सेफ्टी सिस्टम’, ‘इमर्जन्सी वाहन प्राधान्य असलेला स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल रोबोट’, ‘एल्डरली फॉल डिटेक्शन व बेबी मॉनिटरिंग सिस्टम’, ‘ऑटोमॅटिक टर्निंग एक्सीडेंट प्रिव्हेन्शन’ तसेच ‘ऑटोमॅटिक गॅस लिकेज डिटेक्टर’ अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश होता. Students Present Impressive, State-of-the-Art Projects

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांद्वारे दैनंदिन जीवनातील समस्यांवर तांत्रिक उपाय सुचवले.

या प्रदर्शनीची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजीत धोटे यांची असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच रोबोटिक्स शिक्षण सहाय्यक शाबास खान, विनोद नगराळे, गीतांजली गेडाम आणि इतर शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले. प्रदर्शनीला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

संस्थेचे संस्थापक माजी आमदार श्री. सुभाष धोटे यांनीही प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे व मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular