Saturday, May 30, 2026
HomeCrimeरामाळा तलाव रोडवर ‘एमडी’चा साठा जप्त

रामाळा तलाव रोडवर ‘एमडी’चा साठा जप्त

Stock of ‘MD’ Drugs Seized on Ramala Lake Road

चंद्रपूर :- शहरातील जलनगर वार्ड परिसरात मेफेड्रोन (एम.डी.) या अमली पदार्थाच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ५५.०९ ग्रॅम ड्रग्ज पावडरसह तब्बल ३.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. MD’ Drugs Seized on Ramala Lake road

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, माधव नारायण मामीड (वय ३६, रा. सपना टॉकीज मागे, जलनगर वार्ड, चंद्रपूर) हा आरोपी रामाळा तलाव रोड परिसरात मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. Chandrapur LCB Lays a Trap

रामाळा तलाव रोडवरील मनपा ओपन गार्डन परिसरात कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीदरम्यान ५५.०९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) पावडर तसेच सिल्वर रंगाची जुनी ज्युपिटर कंपनीची मोपेड (क्र. MH-34 BN-4861) असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनिल गौरकार तसेच पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, सचिन गुरनुले, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अजीत शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular