Saturday, January 17, 2026
HomeCrimeघरफोडीच्या आरोपीला राजुरा पोलिसांची अटक

घरफोडीच्या आरोपीला राजुरा पोलिसांची अटक

Rajura police arrested the accused of burglary

चंद्रपूर :- राजुरा येथील शेतकरी कुटुंब शेतीच्या कामाला गेले असता त्यांच्या घराची घरफोडी करणाऱ्या चोराला राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी शुभम खोके याला अटक करीत चोरीतील सोन्याचे दागिने व नगदी रक्कम असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Burglary Crime

राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील पेठ वार्डात राहणारे प्रशांत बावणे आपल्या परिवारासाह घराला कुलूप लावून शेतात गेले, शेतीकाम आटोपून घरी परत आले असता घराचा दरवाज्याचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले, घरात प्रवेश केला असता कपाटातील सोन्याचे दागिने यात सोन्याची गोप, सोन्याची पोत, कानातील सोन्याचे जोड, अंगठी, चांदीची चाळ व 10,000 रुपये नगदी रक्कम असा एकूण 1,20,000 रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले दरम्यान बावणे यांनी राजुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. Rajura Police Station

राजुरा पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत Rajura DB गुन्हे शोध पथकाला आदेशीत केले दरम्यान गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवीत, गोपनीय माहिती काढीत राजुरा शहरातील किसान वार्डातील संशयित शुभम खोके याला ताब्यात घेत पोलिसीखाक्या दाखवला असता आरोपीने सदर घरफोडी गुन्ह्याची कबुली दिली यावरून चोरीतील सर्व सोने, चांदीचे दागिने व नगदी रक्कम असा सर्व एवज जप्त करण्यात आला.
पुढील तपास पोउपनि भीष्मराज सोरते करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, राजुरा पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात शोध पथक प्रमुख सपोनि रमेश नन्नावरे, पोउपनि भीष्मराज सोरते, सफौ किशोर तुमराम, पोहवा अनुप डांगे, कैलास आलाम, पो.अ. अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, योगेश पिदूरकर, शफिक शेख, तिरुपती जाधव, दत्ता चव्हाण, रामराव बिंगेवाड यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular