Rajura Congress salutes Bharat Ratna late Rajiv Gandhi
चंद्रपूर :- आधुनिक भारताचा भक्कम पाया रचणारे, भारतीय तंत्रज्ञान व संगणक क्रांतीचे प्रनेते माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी Rajiv Gandhi यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी ठिक ११ वाजता माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली सद्भावना दिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्त भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. Rajura Congress salutes Bharat Ratna late Rajiv Gandhi
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, धनराज चिंचोलकर, हेमंत झाडे, संतोष मेश्राम, रवी त्रिशूलवार, उमेश गोरे, मधुकर झाडे, आकाश मावलीकर, संघपाल देठे, गौरव भोयर यासह राजुरा काँग्रेसच्या फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.