Remove illegal parking of heavy vehicles on both sides of roads causing fatal accidents – Sachin Bhoyar
चंद्रपूर :- कोरपणा तालुक्यातील गडचांदुर शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर, राज्य महामार्गावर, गडचांदुर शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच राजुरा शहरालगत मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या दुतर्फा शेकडोच्या संख्येने जड वाहणे अवैधपणे पार्कीग केल्या जात आहे. जड वाहणांची अवैध पार्कीग जिवघेण्या अपघातास तसेच नागरी वाहतुकीस कारणीभुत ठरत आहे. अनेक वर्षापासुन अवैध जड वाहण पार्कीगमुळे झालेल्या अपघातात शेकडोहुन अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेकजण गंभीर दुखापत ग्रस्त झालेले आहेत. Remove illegal parking of heavy vehicles on both sides of roads
मागील पंधरा दिवसात पार्कीग नियम न पाळता अवैध पार्कीग केलेल्या जड वाहनांमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 8 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात जिवती तालुक्यातील 4 तरुण मुलांना, निमणी गावातील दोघांना व बाईक अपघातात अन्य दोन असे एकुण आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी पुर्णपणे रहदारीच्या प्रमुख रस्त्यांवरी अवैध पार्कीग तसेच जड वाहणांच्या अवैध पार्कीग कडे दुर्लक्ष करणारे पोलीस प्रशासन, प्रादेशीक परिवहन विभाग, वाहतुक विभाग, नगरपालीका प्रशासन कारणीभुत आहे.
शहरालगत मुख्य मार्गांवर रस्त्यांच्या दुतर्फा अवैध पार्कंग करण्यात येणा-या जड वाहणांवर पोलीस विभागातर्फे, प्रादेशीक परीवहन विभागातर्फे, नगरपालिका प्रशासनातर्फे कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये प्रचंड रोष आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांना जिवघेण्या अपघातास कारणीभुत रस्त्यांच्या दुतर्फा करण्यात येणारी जड वाहनांची अवैध पार्कीग हटविण्याबाबत निवेदन देण्यात आले तसेच चिमुकलीच्या हस्ते पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका साहेब यांना राखी बांधून पुन्हा कोणत्या बहिणीला जड वाहनाच्या अवैध पार्किंगमुळे रस्ते अपघातात आपला भाऊ गमवावा लागू नये याबाबत सदर अवैध पार्क जड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
येणाऱ्या काळात जड वाहनांची अवैध पार्कींग हटविली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र जनआंदोलन उभारेल असे सचिन भोयर यांनी इशारा दिला.
यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष मनदीप रोडे, राहुल बालमवार, कामगार सेनेचे प्राध्यापक नितीन भोयर, कोरपना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, वाहतूक सेनेचे महेश वासलवार, जनहित सेलचे रमेश कलबंधे, संजय फरदे, सचिन पॉल ,सोनू डांगे, मंगेश चौधरी, अक्षय बांद्दकर,किशोर गाडगे, सागर मोझरकर, लिखित मांढरे सह इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.