Thursday, September 10, 2026
HomeCulturalदीक्षाभूमी विकासावर प्रश्नचिन्ह? संस्थेची पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह भूमिका

दीक्षाभूमी विकासावर प्रश्नचिन्ह? संस्थेची पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह भूमिका

चंद्रपूर :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि बौद्ध धम्माच्या मानवतावादी मूल्यांचा प्रसार करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी, चंद्रपूरच्या वतीने दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. Chandrapur DikshaBhoomi

दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी ५६ कोटी ९० लाख ६८ हजार ४५३ रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, हा निधी संस्थेच्या खात्यावर थेट वर्ग केला जाणार नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

दीक्षाभूमी हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक समता, बंधुता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि प्रबोधनाचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

अवैध धंद्याविरुद्ध चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई…..

दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना यश मिळून महाराष्ट्र शासनाकडून पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दीक्षाभूमी हा ज्ञानाचे केंद्र व्हावा, हा दृष्टिकोन लक्षात घेऊन परिसरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कॉन्फरन्स हॉल तसेच विविध संशोधन केंद्रे उभारण्यात आली आहेत.

विकासाच्या पुढील टप्प्यात दीक्षाभूमी परिसरात आकर्षक व भव्य विहार, भिक्खू निवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, विविध सोयी-सुविधा तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

खासदार प्रतिभा धानोरकर यांची संसदीय इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर नियुक्ती

स्थानिक आमदारांच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. त्यांनी दीक्षाभूमीचे ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन विधानसभेतही या विकासासाठी भूमिका मांडली. त्यानंतर शासनस्तरावरील प्रक्रिया पूर्ण होऊन विकास प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली.

निधी संस्थेकडे येणार नाही
दीक्षाभूमी विकासासाठी मंजूर निधी संस्थेच्या खात्यावर अथवा संस्थेकडे थेट देण्यात येणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांच्या प्रशासकीय व तांत्रिक देखरेखीखाली टप्प्याटप्प्याने विकासकामे केली जाणार आहेत. त्यामुळे निधीच्या वापराबाबत गैरसमज निर्माण करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

दुर्गापूर ग्रामस्थांचे उपोषण आंदोलन तूर्तास स्थगित….

३ सप्टेंबरच्या बैठकीत गोंधळामुळे चर्चा अपूर्ण
दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात तसेच आगामी धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या नियोजनासाठी ३ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेच्या वतीने सामूहिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाजबांधवांना संस्थेची भूमिका, विकासकामांची सद्यस्थिती आणि आगामी नियोजन याबाबत माहिती देण्याचा उद्देश होता.
उपस्थित समाजबांधवांना प्रश्न व मते मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र, चर्चेदरम्यान काही उपस्थितांकडून विषयांतर आणि गोंधळ झाल्याने नियोजित पद्धतीने सर्व विषयांवर चर्चा करणे शक्य झाले नाही. सामाजिक वातावरण अधिक बिघडू नये, यासाठी बैठक पुढे न चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.
संस्था प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचा आदर करते. मात्र, प्रश्नोत्तराची प्रक्रिया शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि विषयाच्या चौकटीत होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

वरोरा बाजार समितीवर खासदार प्रतिभा धानोरकरांच्या नेतृत्वात सत्तांतर

अधिकृत कागदपत्रांच्या आधारे माहिती देण्याची तयारी
दीक्षाभूमीच्या विकासाबाबत समाजबांधवांच्या योग्य प्रश्नांना कागदपत्रे आणि अधिकृत माहितीच्या आधारे उत्तरे देण्याची संस्थेची तयारी आहे. विकासकामे कोणत्या शासकीय यंत्रणेमार्फत होणार, त्यांची प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया काय आहे, याची माहिती उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समाजासमोर ठेवण्यात येईल.
अफवा, अपूर्ण माहिती अथवा गैरसमजांच्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी अधिकृत माहिती तपासावी, असे आवाहनही संस्थेने केले.

दीक्षाभूमी विहार विकास समिती’ची स्थापना
दरम्यान, ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याबरोबरच वर्षभर विविध धम्म, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन करण्यासाठी ‘दीक्षाभूमी विहार विकास समिती’ची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी, चंद्रपूरच्या मान्यतेनुसार चंद्रपूर शहरातील विविध विहार व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही समिती गठित करण्यात आली.

समितीच्या माध्यमातून धम्मप्रबोधन कार्यक्रम, बुद्धवंदना, व्याख्याने, धम्मशिबिरे, सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम, युवक व महिलांसाठी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, जयंती व स्मृतिदिनांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत गौतम बुद्ध जयंती आणि महापरिनिर्वाण दिन यांसारख्या महत्त्वपूर्ण दिवसांचे वर्षभर नियोजन करण्यात येणार आहे.

दीक्षाभूमी केवळ एका विशिष्ट दिवसापुरती मर्यादित न राहता वर्षभर धम्म, प्रबोधन, सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र म्हणून विकसित व्हावी, हा समितीचा उद्देश आहे.

चंद्रपूर शहरासह विदर्भातील विविध विहारांचे अध्यक्ष, संस्था-संघटना, भिक्खू संघ, सामाजिक कार्यकर्ते, धम्म अनुयायी, युवक व महिला तसेच जिल्ह्यातील तालुका स्तरावरील विहार प्रमुखांना सोबत घेऊन समन्वयाने काम करण्याचा समितीचा मानस आहे. दीक्षाभूमीची स्वच्छता, शिस्त, पावित्र्य तसेच धम्म अनुयायी व पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांकडेही समिती लक्ष देणार आहे.

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या सूचनांना मान्यता
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाजबांधवांकडून करण्यात आलेल्या विविध सूचनांचाही समितीने स्वीकार केला आहे. त्यामध्ये पेंडलचा विस्तार करणे, महिलांसाठी योग्य प्रसाधनगृहाची व्यवस्था करणे तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
वादापेक्षा संवादाला प्राधान्य
दीक्षाभूमी ही कोणत्याही व्यक्ती अथवा गटाची मालमत्ता नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जोडलेली समाजाची प्रेरणाभूमी आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर मतभेद असले तरी ते संवादाच्या माध्यमातून सोडविणे आवश्यक आहे. सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन दीक्षाभूमीच्या विकासाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेने केले.

वाद नको, संवाद हवा; आरोप नको, अधिकृत माहिती हवी. मतभेद असले तरी दीक्षाभूमीचा विकास त्यापेक्षा मोठा आहे. सर्वांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाला सहकार्य करावे,” असा संदेश पत्रकार परिषदेत देण्यात आला.

समितीची कार्यकारिणी
‘दीक्षाभूमी विहार विकास समिती’मध्ये विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कायदेविषयक, पत्रकारिता आणि महिला प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये नेताजी भरणे, आनंद वनकर, अमर फुलझेले, प्राविण्य पाथार्डे, धम्मदीप मेश्राम, चालुशिला ब्राम्हणे, भाष्कर भगत, चेतन उंदीरवाडे, किशोर सवाने, तथागत पेटकर, डॉ. अजित खोबरागडे, डॉ. प्रविण डोंगरे, डॉ. शरयू पाझारे, अविनाश टिपले, लिमेश जंगम, नकूल कांबळे, प्रा. विलास दुर्गे, प्रा. दुष्यंत नगराळे, प्रा. मुकुंद शेंडे, अॅड. संजय निरंजने, अॅड. राजेश वनकर, वनश्री मेश्राम, तनुजा रायपूरे, ज्योती सहारे, गायत्री रामटेके, सुजाता लाटकर, अनुताई दहेगांवकर, डॉ. विजया कांबळे, सविता रामटेके, सुरेंद्र रायपूरे, सुनील पाटील आणि दिलीप वावरे यांचा समावेश आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular