*प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरः उपोषणाला तूर्तास स्थगिती..!*
*10 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा*
चंद्रपूर :- दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीला बसविण्यासाठी फिल्टर प्लांटमध्ये ठेवण्यात आलेले सोलर प्लेट्स चोरून नेणाऱ्या उपसरपंचावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या रास्त मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी अखेर प्रशासनाला जाग आली आहे.
पंचायत समिती चंद्रपूर येथील विस्तार अधिकारी मा. पाल व मा.येरावार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. प्रशासनाने या प्रकरणात मध्यस्थी करीत पुढील दहा दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल देण्याचे मान्य केले आहे. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासन व प्रशासनाच्या या माध्यस्थीनंतर उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला दहा दिवसांचा वेळ दिला असून आपले उपोषण तूर्तास मागे घेतले आहे.
उपोषणकर्ते यांना प्रशांत भारती, संतोष पारखी, सुरेंद्र रायपुरे आणि मोनी आसवानी यांनी नारळ व निंबूपाणी पाजून उपोषण सोडण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत जर संबंधित उपसरपंच यावर गुन्हा दाखल करून कारवाई झाली नाही तर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा उपोषणकर्ते यांनी याप्रसंगी दिला.
उपोषणकर्ते विनीत तावाडे, प्रमोद जामानिक, आंदोलनात सहभागी कार्यकर्ते महेबूब शेख, गुरु भगत, पावलस रत्ने, आकाश रामटेके, रवी पवार, प्रकाश दुर्योधन, सचिन नकले, सतीश दुर्गे, बाळू चुनारकर, शैलेश भगत, लाला कातकर, बाळू मुरमाळे, महेश भगत, राकेश भगत, शैलेश झाडे, शंकर दुर्गे, इमरान कुरेशी, नितेश ढोके, सोहेल कुरेशी, प्रफुल ढोरके, वसीम कुरेशी यांचेसह दुर्गापूरवासियांचा मोठा पाठींबा मिळाला होता.
