Thursday, September 10, 2026
HomeEducationalराष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा येथे १ ते ८ सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

नागरिकांमध्ये संतुलित आहार, पोषणमूल्ये आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. National Nutrition Week at Kalyan College of Nursing

अवैध धंद्याविरुद्ध चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई…..

सप्ताहादरम्यान नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य आणि आरोग्य जनजागृती रॅली यांच्या माध्यमातून पोषणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. कुपोषण, अ‍ॅनिमिया तसेच पोषणाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी नागरिकांना माहिती देत योग्य आहाराच्या सवयींबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी विविध पौष्टिक व पारंपरिक पदार्थांचे स्टॉल्स उभारून संतुलित आहाराचे प्रात्यक्षिक सादर केले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पोषक घटकांचा दैनंदिन आहारात योग्य वापर कसा करता येईल, याची माहितीही यावेळी देण्यात आली. रॅलीतून आरोग्याचा जागर राजुरा शहरातून काढण्यात आलेल्या आरोग्य जनजागृती रॅलीत विद्यार्थ्यांनी पोषण व आरोग्यविषयक घोषणांच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधले.

‘संतुलित आहार घ्या, निरोगी जीवन जगा’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पोषण जनजागृतीचा प्रसार केला.

गरोदर महिला, बालके व वृद्धांच्या आहारावर मार्गदर्शन आयोजित व्याख्यान सत्रात तज्ज्ञ डॉक्टर व प्राध्यापकांनी गरोदर महिला, बालके आणि वृद्ध व्यक्तींच्या आहारातील पोषणाचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य आहार, पोषणाची गरज आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे तसेच अतिथी मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ रुग्णसेवेपुरते मर्यादित न राहता समाजात आरोग्य, पोषण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा संदेश पोहोचविण्यात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या संपूर्ण उपक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular