Government should not see the end of tolerance – MP Pratibha Dhanorkar
Protest march of Mahavikas Aghadi for women safety in Chandrapur city.
चंद्रपूर :- भारतीय संस्कृतित महिलांना मानाचे स्थान आहे. देशाच्या विकासात महिलांचा मोठा वाटा आहे. परंतु सद्याचे सरकार हे महिलांच्या सुरक्षेप्रती उदासीन असल्याने बदलापूर सारख्या घडत आहेत. सरकार ने नागरीकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी चंद्रपूर शहरात आयोजित निषेध मोर्चात व्यक्त केले. Protest march of Mahavikas Aghadi for women safety in Chandrapur
उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद ला प्रतिबंध लादल्याने आज चंद्रपूर शहरातील गांधी चौकात तोंडावर काळ्या फिती लावून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सुसंस्कृत म्हणून प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्र मागील दहा दिवसांत अत्याचाराच्या अनेक घटना घडून आल्या. बदलापूर च्या घटने ने चिमुक्या मुली देखील सुरक्षीत नाही. परंतु या सुरक्षेची जबाबदारी असलेले सरकार कुंभकरणी झोपेत आहे, असे मत देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज व्यक्त केले. सरकार ने नागरीकांचा अंत पाहू नये अन्यथा महिला सुरक्षेसाठी प्रत्येक नागरीक रस्त्यावर उतरेल असे देखील खासदार धानोरकर यांनी सांगितले. Government should not see the end of tolerance – MP Pratibha Dhanorkar
या निषेध मोर्चा वेळी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर शहर कॉग्रस चे अध्यक्ष रितेश तिवारी, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष दिपक जयस्वाल, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे, चंद्रपूर जिल्हा युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, माजी महापौर संगिता अमृतकर, गोपाल अमृतकर, प्रशांत भारती, सुधाकर अंभोर, कुणाल चहारे, यश दत्तात्रय, प्रविण वडवेकर, सुनिता लोढीया, अनिरुध्द वनकर व इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच नागरीकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.