Rain brings relief to the residents of Wani
राजपाल खैरे, वणी प्रतिनिधी
वणी :- गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या वणीकरांना आज सायंकाळी झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला. Rain Relief हवामान विभागाकडून अती उष्णतेचा इशारा देण्यात आलेला असतानाच अचानक पावसाने हजेरी लावल्याने शहरात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. 600 कोटींचे मेडिकल कॉलेज धूळखात……
यंदाच्या वर्षी उष्णतेने मागील अनेक वर्षांचे उच्चांक मोडले असून दिवसभर कडक उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारच्या वेळेत वणी शहरातील प्रमुख रस्तेही सुनसान दिसत होते. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. अंगाची लाही-लाही करणाऱ्या उकाड्यामुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले होते.
अशा परिस्थितीत सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून काही काळासाठी का होईना, नागरिकांना दिलासा मिळाला. अनेकांनी पावसाचा आनंद घेत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, हवामानातील या बदलामुळे आगामी काही दिवसांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.