Saturday, January 18, 2025
HomeAccidentपत्नीने घेतली विहिरीत उडी, वाचवायला पती गेला..

पत्नीने घेतली विहिरीत उडी, वाचवायला पती गेला..

wife jumped into the well, the husband went to save her.. Both died

चंद्रपूर :- घरगुती कारणातून वाद झाल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिला वाचवायला तिच्या मागोमाग पतीनेसुद्धा विहिरीत उडी घेतली. Suicide मात्र दोघांचाही विहिरीत बुडून करून अंत झाला. Husband and wife drowned in a well

ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात शनिवारी रात्री 9.30 वाजताचा सुमारास घडली. पती पत्नीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावातच शोककळा पसरली आहे.

प्रकाश शरबत ठेंगणे 30 वर्ष , उषा प्रकाश ठेंगणे 27 वर्ष अशी मृत दांपत्याचे नाव आहेत.

प्राप्त माहितीनुसार, प्रशांतने मागील तीन महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील इल्लूर येथील उषा हिचासोबत आंतरजातीय प्रेमाविवाह केला होता. सुखी संसार सुरु असतानाच शनिवारी रात्री दोघात वाद झाला, रागाच्या भारत उषाने घराशेजारील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी प्रकाशने सुद्धा लगेच विहिरीत उडी घेतली. दरम्यान शेजारच्याने हे दृश्य बघून इतरांना या घटनेची माहिती दिली.

गावातील नागरिकांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती देताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळ गाठून विहिरीत शोध मोहीम राबवली दरम्यान दोघांचेही मृतदेह आढळून आले.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular